साखरपुडा थांबवून त्याला बाईकवर घेऊन गेली प्रेयसी, beloved came and forced her lover not to tie with

साखरपुडा थांबवून त्याला बाईकवर घेऊन गेली प्रेयसी

साखरपुडा थांबवून त्याला बाईकवर घेऊन गेली प्रेयसी

www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ
प्रेम माझ्याशी आणि लग्न दुसऱ्याशी असे होण्यापूर्वी तुला जेलची सैर करून देईल... हा काही कोणत्या चित्रपटाचा सीन नसून आग्रातील अछनेरा गावातील ग्राम पंचायतीतील हे दृश्य आहे. प्रेयसी दुसऱ्या जातीची असल्याने प्रियकराचे लग्न त्याचा कुटुंबियांनी दुसरीकडे निश्चित केलं. पण साखरपुडा सुरू असताना फिल्मी स्टाइलमध्ये प्रेयसी आली आणि तीने तो कार्यक्रम थांबवला. त्यानंतर तिने प्रियकराला बाइकवर बसवलं आणि आपल्या सोबत घेऊन गेली.

अजब प्रेमाची गजब काहणी ही कचोरा गावातील आहे. गावातील एका तरूणाचे दुसऱ्या जातीतील तरूणीसोबत वृंदावनच्या अक्षयपात्र योजनेत काम करीत होता. दोघांमध्ये सूत जुळलं. या दरम्यान तरूणी अनेकवेळा तरूणाच्या गावातही आली. दोन्ही वेगळ्या जातीचे असल्याने कुटुंबाला हे संबंध मान्य नव्हते. काही दिवसांपूर्वी तरुणाचे दुसरीकडे लग्न जुळवले. तरुणाने प्रेयसीला आपल्या साखरपुड्याचे निमंत्रण पाठवले. पण साखरपुड्याचे विधी सुरू असताना मुलगी वडिलासोबत त्या ठिकाणी आली. जोरात भांडण झालं शेवटी एका मंदिरात ग्रामपंचायतीची सभा बोलावण्यात आली.

या सभेत तरुणाच्या कुटुंबियांनी मुलीला समजवले. आता साखरपुड्याची तयारी झाली लग्नाच्या पत्रिका वाटल्या असे तिला सांगितले पण तिने एक ऐकले नाही. प्रेम माझ्याशी आणि लग्न दुसऱ्याशी हे चालणार नाही. तुम्हांला जेलची हवा खावी लागेल. हे ऐकल्यावर तरूण त्या तरुणीसोबत जायला तयार झाला. प्रियकराला प्रेयसी बाइकवर बसवून आपल्यासोबत घेऊन गेली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 11, 2014, 19:24


comments powered by Disqus