अमेरिकेवर ओबामांचा कायदा, पण भारताला काय फायदा? Benefits to India from Obama

अमेरिकेवर ओबामांचा कायदा, पण भारताला काय फायदा?

अमेरिकेवर ओबामांचा कायदा, पण भारताला काय फायदा?
www.24taas.com, नवी दिल्ली

अमेरिकेची कमान दुस-यांदा सांभाळणारे बराक ओबामा भारतीयांच्या पदरात काय टाकणार, याकडे भारतीय जनतेचं लक्ष लागलंय. अर्थव्यवस्था आणि आऊटसोर्सिंगसंदर्भात ओबामा काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. भारताच्या विशेषतः कॉर्पोरेट जगताच्या ओबामांकडून काय अपेक्षा आहेत?

ओबामांच्या विजयाचा जल्लोष अमेरिकेत तर झालाच, पण ओबामांच्या विजयाचा आनंद भारतातही साजरा झाला. पण ओबामांनी या दुस-या इनिंगमध्ये भारतीयांच्या अपेक्षांचा विचार केला तर हा जल्लोष ख-या अर्थानं भारतीयांना आनंद देऊ शकेल. ओबामा आऊटसोर्सिंग आणि व्हिसाची धोरणं शिथील करतील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

अमेरिकेत नोकरी करणा-या भारतीयांबद्दल ओबामा काय धोरण आखतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर रोम्नी या मुद्द्यावर जास्त उदार धोरणाचे होते. पण आता सुपर पॉवरची कमान आता ओबामांच्या हातात आहे. अमेरिकेतले बाजार फुलले तर भारतीय अर्थव्यवस्थेलाही गती येणार आहे. कॉर्पोरेट क्षेत्राच्याही ओबामांकडून ब-याच अपेक्षा आहेत. कॉर्पोरेट जगत आणि शेजारी राष्ट्रांशी संबंधात ओबामा चांगले निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे.

येणारी चार वर्षं ओबामांचं नेतृत्व अमेरिकेला कुठल्या शिखरावर घेऊन जाणार, याबद्दल उत्सुकता आहे. अमेरिकन जनतेबरोबरच भारतालाही ओबामांच्या ‘लूक फॉरवर्ड’कडून बऱ्य़ाच अपेक्षा आहेत.

First Published: Wednesday, November 7, 2012, 18:25


comments powered by Disqus