`भगतसिंगांच्या चरित्राचं प्रकाशन मोदींच्या हस्ते होऊ देणार नाही!`, No Modi for Bhagat Singh

`भगतसिंगांच्या चरित्राचं प्रकाशन मोदींच्या हस्ते होऊ देणार नाही!`

`भगतसिंगांच्या चरित्राचं प्रकाशन मोदींच्या हस्ते होऊ देणार नाही!`
www.24taas.com, झी मीडिया, चंडिगढ

क्रांतिकारक भगतसिंग यांचं चरित्र प्रकाशित होत असून या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र, पुस्तकाच्या लेखकाने आणि प्रकाशकांसह काही नागरिकांनी या गोष्टीला विरोध दर्शवला आहे.

इंग्रजांविरुद्ध इन्कलाबचा नारा देणारे भगत सिंग यांच्या चरित्रावर "शहीद ए आजम भगत सिंह` हे पुस्तक लिहण्यात आलं आहे या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी भगतसिंग यांच्या धाकटे बंधू कुलबीरसिंग यांचा नातू यादविंदरसिंग यांनी मोदी यांना निमंत्रण दिले आहे. मात्र, भगतसिंग यांच्या काही नातेवाइकांनी तसंच पुस्तकाच्या लेखकाने मोदींच्या हस्ते पुस्तक प्रकाशनाला विरोध केला आहे. दिल्ली येथील तालकटोरा स्टेडिअममध्ये पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. मोदींनी निमंत्रण स्वीकारले आहे.

मात्र, लेखक व काही नातेवाइकांनी मोदींच्या हस्ते प्रकाशनाला विरोध केला आहे. लुधियाना येथील भगतसिंग यांचा भाचा असलेले प्राध्यापक जनमोहनसिंग यांनी मोदींच्या हस्ते प्रकाशनाला विरोध केला असून, याविरोधात मोहीम सुरू केली आहे.

लाहोर येथील मध्य कारागृहात भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली. फाशी देण्याच्या एक दिवस अगोदर भगतसिंग यांनी कारागृहातील अनुभवावर लिहिलेली डायरी कुलबीरसिंग यांच्याकडे दिली होती. डायरीचे १९९० मध्ये प्रथम प्रकाशन करण्यात आले होते. यानंतर पंजाबी भाषेमध्येही प्रकाशन करण्यात आले आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 15, 2013, 15:11


comments powered by Disqus