Last Updated: Monday, November 18, 2013, 16:00
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देशातील सर्वोच्च नागरिक सन्मान ‘भारतरत्न’ दिला गेल्या नंतर आता या मुद्द्यावर राजकारण रंगू लागलंय. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली. नितीशकुमारांनी वाजपेयींसोबतच बिहारचे नेता कर्पूरी ठाकुर यांनाही ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केलीय.
नितीशकुमारांपाठोपाठ आता केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांनीही अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्याची मागणी केलीय. रविवारी भाजपनं अटलजींना भारतरत्न देण्याची मागणी करत काँग्रेसवर टीका केली होती.
दुसरीकडे केंद्रीय मंत्री फारुख अब्दुल्ला यांनीही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना देशातला सर्वोच्च नागरिक सन्मान देण्याच्या मागणीचं समर्थन केलं. ते म्हणाले, मी भाजपचा सदस्य नाही पण कोणताच भारतीय व्यक्ती हे विसरू शकत नाही की वाजपेयी एक महान नेता आहेत. मी सरकारला त्यांना भारतरत्न देण्याची विनंती करतो.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, November 18, 2013, 16:00