मोबाईल कॉल्सचे दर हृदयाचे ठोके चुकवणार?, Bharti Airtel and Idea hike call tariffs

मोबाईल कॉल्सचे दर हृदयाचे ठोके चुकवणार?

मोबाईल कॉल्सचे दर हृदयाचे ठोके चुकवणार?
www.24taas.com, नवी दिल्ली

मोबाईल धारकांच्या खिशावर पुन्हा एकदा ताण पडणार असं दिसतंय. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच मोबाईल ऑपरेटर कंपन्या एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या मोबाईलच्या कॉल्सदर दुप्पट वाढण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरटेल आणि आयडिया या कंपन्यांनी आपल्या कॉलदरामद्ये जवळजवळ १०० टक्के वाढ केलीय. तर दुसरीकडे व्होडाफोनंनही आपल्या व्हॉईस कॉल्सच्या दरांत वाढ केलीय. एअरटेलचा एक रुपये प्रति मिनिट असणारा कॉल दरवाढीनंतर दोन रुपये प्रति मिनिट होण्याची शक्यता आहे. तर आयडियाचा १.२ पैसे पर सेकंद असणारा कॉल दरवाढीनंतर २ पैसे प्रति सेकंद असा होणार आहे.

व्होडाफोनच्या कॉल्सदरांबाबत मात्र कंपनीकडून काही अंदाजा व्यक्त करण्यात आलेला नाही. शिवाय, यापैकी कोणत्याही मोबाईल कंपनीनं कॉल्सदर वाढण्याची औपचारिक घोषणा अजून केलेली नाही.

First Published: Wednesday, January 23, 2013, 15:54


comments powered by Disqus