‘मोठा भीम’ पेलणार दिल्ली ‘निवडणुकीचा डोंगर’!, `bhim` pravinkumar will join AAP

‘मोठा भीम’ पेलणार दिल्ली निवडणुकीचा डोंगर...

‘मोठा भीम’ पेलणार दिल्ली निवडणुकीचा डोंगर...

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

छोट्या पडद्यावर बहूचर्चित आणि लोकप्रिय ठरलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत भीमाची भूमिका निभावणारे प्रवीणकुमार आता दिल्ली निवडणुकीचा डोंगर पेलणार आहेत. येत्या रविवारी ते अधिकृतरित्या अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आम आदमी पार्टीत सहभागी होतील.

करावल नगर विधानसभा अंतर्गत एणाऱ्या सोनिया विहार वॉर्डमध्ये होणाऱ्या केजरीवाल यांच्या जाहीर सभेत ते ‘आप’मध्ये सहभागी होतील. महाभारत मालिकेतील या भीमासमोर भाजपच्या महेंद्र नागपाल यांचे कडवे आव्हान आहे. त्यामुळे छोटय़ा पडद्याच्या कुरुक्षेत्रावर पराक्रम गाजविणारा `भीम` निवडणुकीच्या महाभारतात विरोधकांना धूळ चाटणार का? याविषयी दिल्लीकरांमध्ये अत्सुकता आहे.

प्रवीणकुमार उर्फ भीम यांनी १९६६ व १९७० साली झालेल्या आशियाई स्पर्धेत थाळीफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. भीमाच्या भूमीकेमुळे घराघरात पोहोचलेल्या प्रवीणकुमार यांना चित्रपटसृष्टीत मात्र फारसे यश आले नाही. त्यांनी ६० चित्रपटांमध्ये काम केले आहे. याचवर्षी वयाची पासष्टी ओलांडणारे प्रवीणकुमार यांना व्यायामाची प्रचंड आवड आहे. किंग्स्टन येथे १९६६ मध्ये झालेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत प्रवीणकुमार यांनी रौप्यपदक पटकावले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, November 12, 2013, 10:17


comments powered by Disqus