Last Updated: Monday, August 20, 2012, 15:24
www.24taas.com, नवी दिल्लीआसाम हिंसाचारानंतर देशभरातलं सर्वात मोठं स्थलांतर घडून आलयं. गेल्या काही दिवसांत जवळपास पाच लाख ईशान्य भारतीय नागरिकांनी आपल्या घरची वाट धरली आहे.
अलिकडच्या काळातलं हे सर्वात मोठं देशांतर्गंत स्थलांतर घडून आलंय. गुजरातच्या गोध्रात २००२ मध्ये उसळलेल्या दंगलीनंतर जवळपास अडीच लाख लोकांनी स्थलांतर केलं होतं. तर त्यापूर्वी १९८४ मध्ये उसळलेल्या शिख दंग्यांवेळी पन्नास हजार नागरिकांनी स्थलांतर केलं होतं. तसंच २००८ मध्ये कंधमाल हल्ल्यानंतरही पंचवीस हजार लोकांनी स्थलांतर केलं होतं. ईशान्येकडील नागरिकांचे हे स्थलांतर अद्यापही सुरुच असून, ईशान्येकडील नागरिकांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण करुन हे स्थलांतर रोखण्याचं आव्हान सरकारसमोर आहे.
First Published: Monday, August 20, 2012, 09:35