Last Updated: Wednesday, July 17, 2013, 09:58
www.24taas.com,झी मीडिया, पाटणाबिहारमधल्या सारन जिल्ह्यात माध्यान्ह भोजन खाल्यामुळे 20विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर 43 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यातील 27 जणांना पटना येथे उपचारासाठी पाठविण्यात आलंय.
भेसळयुक्त तेलाचा वापर करण्यात आल्यानं हे सर्व विद्यार्थी आजारी पडले अशी शक्यता व्यक्त करण्यात येतीय. या प्रकरणानंतर दोन शिक्षक फरार आहेत. राज्य सरकारनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
तसंच मृत परिवाराच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची आणि आजारी मुलांवर मोफत उपचार करण्याची घोषणा बिहार सरकारनं केलीय. दरम्यान भाजप आणि राजदने आज छपरा बंदच आवाहन केलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, July 17, 2013, 09:58