`हिंदू दहशतवादा`वर भाजपचं आज देशभर आंदोलन, bjp andolan on hindu terrorism

`हिंदू दहशतवादा`वर भाजपचं आज देशभर आंदोलन

`हिंदू दहशतवादा`वर भाजपचं आज देशभर आंदोलन
www.24taas.com, नवी दिल्ली

भाजपतर्फे आज देशभर आंदोलन पुकारण्यात आलंय. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजप आणि आरएसएसच्या शिबिरात हिंदू दहशतवाद चालतो, असं वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात आज भाजप रस्त्यावर उतरणार आहे.

भाजपच्या अध्यक्षपदाची कमान पुन्हा एकदा हाती घेताच राजनाथ सिंह यांनी काँग्रेसविरोधात एल्गार पुकारलाय. राजनाथ सिंहांनी पहिली आघाडी उघडलीय ती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंविरोधात... भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिबिरं ही हिंदू दहशतवादाची केंद्र बनली आहेत, या वादग्रस्त विधानानंतर भाजपनं शिंदेंविरोधात आक्रमण सुरू केलंय. त्याचाच भाग म्हणून आज देशभरात शिंदेंविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. शिंदे यांचा ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द त्याला या वादाला कारणीभूत ठरलाय. शिंदेंचं हे वक्त्व्य म्हणजे केंद्र सरकार दहशतवादाविरुद्धची लढाई गंभीररित्या हाताळत नसल्याचंच स्पष्ट होत असल्याची टीका राजनाथ सिंहांनी केलीय.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी शिंदेंची पाठराखण केलीये. त्यामुळे काँग्रेस फक्त वोट बँकेचंच धोरण देशात अवलंबित असल्याचं टीकास्त्रही राजनाथ सिंहांनी सोडलंय. एकूणच गडकरींच्या रुपानं एका मराठी गड्याची दिल्लीतून गच्छंती झाल्यानंतर आता शिंदेंच्या रुपानं दुसरा एक मराठी गडी अडचणीत सापडण्याची चिन्ह दिसू लागलीत.

First Published: Thursday, January 24, 2013, 08:56


comments powered by Disqus