पंतप्रधानांच्या राजीनाम्यावर भाजपा ठाम BJP firm on PM`s resignation

पंतप्रधानांच्या राजीनाम्यावर भाजपा ठाम

पंतप्रधानांच्या राजीनाम्यावर भाजपा ठाम

www.24taas.com, मुंबई

कोळसाखाण घोटाळाप्रकरणी पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, यावर भाजप ठाम असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी कोळसाखाण घोटाळ्याला पंतप्रधान मनमोहन सिंग हेच जबाबदार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे मनमोहन सिंग यांनी त्वरीत राजीनामा द्यावा, अशी मागणी सुषमा स्वराज यांनी केली आहे.

मुंबईत सुषमा स्वराज यांनी पत्रकार परिषद घेतली. सध्याचं सरकार हे सर्वाधिक घोटाळ्यांचं सरकार असल्याची टीका स्वराज यांनी केलीये. खाणींचे परवाने रद्द करावेत तसंच खाण वाटप घोटाळ्याची निप:क्षपातीपणे चौकशी व्हावी अशी मागणीही भाजपनं लावून धरलीय.

कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. कोळसाकांडप्रकरणी पंतप्रधानांच्या राजीनाम्य़ावर अडून बसलेल्या भाजपनं आता एक पाऊल मागं घेण्याची तयारी दर्शवली होती.

पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणी मागे घेऊन वाटप केलेल्या खाणींचे परवाने रद्द करण्याची मागणी भाजपनं केली. तसंच खाण वाटप घोटाळ्याची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी मागणीही भाजपनं लावून धरली होती.

First Published: Sunday, September 2, 2012, 15:57


comments powered by Disqus