Last Updated: Thursday, March 20, 2014, 18:46
www.24taas.com, झी मीडिया, लखनऊउत्तर प्रदेशमधील अलाहाबादमध्ये भारतीय जनता पक्षाच्या युवा नेत्याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. हत्या झाल्यानंतर संपूर्ण अलाहाबादमध्ये तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे.
विमाल पांडे (२६) यांच्यावर बुधवारी रात्री गोळ्या झाडण्यात आल्या. हत्ये झाल्याचे समजताच संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी दवाखान्याची तोडफोड केल्याचे वृत्त आहे. काही कार्यकर्ते रस्त्यावर आल्याने शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
विमाल पांडे यांच्या हत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. तसेच घटनास्थळावर तपासणी सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, March 20, 2014, 17:06