होय, भाजपवाले चोर आहेत - नरेंद्र मोदी, bjp leaders are thieves - narendra modi

होय, भाजपवाले चोर आहेत - नरेंद्र मोदी

होय, भाजपवाले चोर आहेत - नरेंद्र मोदी

www.24taas.com, झी मीडिया, छतरपूर, मध्यप्रदेश

‘होय, आम्ही भाजपवाले चोर आहोत’ अशी कबुली दिलीय खुद्द भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

मध्यप्रदेशच्या छतरपूरमध्ये निवडणूक रॅलीदरम्यान काँग्रेसवर हल्लाबोल करताना नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केलंय. ‘आम्ही काँग्रेसच्या आरोपांचा स्वीकार करतो की आम्ही चोर आहोत... कारण, आम्ही पूर्ण काँग्रेस पक्षाची झोपच चोरलीय’, असं नरेंद्र मोदी यांनी छतरपूरमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना म्हटलंय.

‘काँग्रेसनं आपल्या कार्यकाळात मध्यप्रदेशाला उद्ध्वस्त करून टाकलंय. काँग्रेस खोटारड्यांची फॅक्टरी आहे आणि दिग्विजय सिंह या फॅक्टरीचे चेअरमन आहेत’ असं त्यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटलंय.

‘काँग्रेसचे नेते भडकाऊ भाषण करतात. पण, कमळाच्या शक्तीसमोर काँग्रेस तणावाखाली आहे’ असं म्हणतानाच त्यांनी पंतप्रधानांनाही सुनावलंय. ‘तुमच्या लोकांनीच तुम्हाला कमीपणा आणलाय. भाजपनं पंतप्रधानांच्या प्रतिमेला कधीही धक्का लावलेला नाही’ असं त्यांनी पंतप्रधानांना म्हटलंय. ‘भाजपला चोर म्हणणारे खोटारडे आहेत. जनतेला इथं मध्यप्रदेशातील विकास दिसतो, पण दिल्लीवाल्यांना मात्र तो दिसत नाही’ असंही मोदींनी यावेळी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, November 18, 2013, 15:06


comments powered by Disqus