BJP leaders frequntly insulted-24taas.com

काँग्रेसकडून भाजपा नेत्यांचा वारंवार अवमान

काँग्रेसकडून भाजपा नेत्यांचा वारंवार अवमान

www.24taas.com, नवी दिल्ली

युपीए सरकारकडून योग्य मानसन्मान केला जात नसल्यानं भाजप नाराज झाली आहे. युपीएकडून किमान प्रोटोकॉलही पाळला जात नाही असा भाजपचा आक्षेप आहे.

याच कारणांमुळं भाजपनं युपीएच्या सोहळ्यांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय. शिवाय युपीएच्या वागणुकीची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. उपराष्ट्रपती हमीद अन्सारींच्या शपथविधी सोहळ्यात शामियान्यात भाजप नेत्यांना बसायला जागाही नव्हती.

या शिवाय स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यातही भाजप नेत्यांना चांगली वागणूक दिली नसल्याचा आरोप करण्यात येतोय. स्वातंत्र्यदिनानिमीत्त बुधावारी रात्री राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यातर्फे आयोजित भोजन कार्यक्रमात अडवाणींसह वरिष्ठ नेते अरुण जेटली, सुषमा स्वराज यांना व्हिआयपी रांगेबाहेर ठेवण्यात आलं. भाजपचे वरिष्ठ नेते आणि इतर निमंत्रित एकत्रीत उभे होते.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना मात्र राष्ट्रपती मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या बाजूची खुर्ची देण्यात आली होती. कॅबिनेट मंत्र्यांनाही अशी जागा मिळाली होती की ते राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसोबत थेट बोलू शकत होते. मात्रसंपूर्ण कार्यक्रमात भाजप नेत्यांना उभे राहावे लागले. एकाच आठवड्यात राष्ट्रपतीभवनात अडवाणींसोबत असे वागण्याची ही दुसरी घटना आहे. युपीएच्या वागणुकीमुळं भाजप संतप्त झाली आहे.

First Published: Thursday, August 16, 2012, 14:58


comments powered by Disqus