किश्तवाड हिंसाचार, राबर्ट वडेरा प्रकरणावरुन विरोधक आक्रमक

किश्तवाड हिंसाचार, राबर्ट वडेरा प्रकरणावरुन विरोधक आक्रमक

किश्तवाड हिंसाचार,  राबर्ट वडेरा प्रकरणावरुन विरोधक आक्रमक
www.24taas.com, नवी दिल्ली

संसदेत विविध मुद्यांवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय..त्यामुळं गेला आठवडा आणि कालच्या दिवशी संसदेचं कामकाज व्यवस्थित होऊ शकलं नाही. हा तिढा सोडवण्यासाठी आता कमलनाथ यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावलीय.

अन्न सुरक्षा विधेयकासह अन्य विधेयकावर सर्वसंमती मिळवण्याचा सरकारकडून प्रयत्न होणार आहे.. एकीकडे गेमचेंजर प्लान अर्थात अन्न सुरक्षा विधेयकावरील चर्चा घडवून आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे तर दुसरीकडे किश्तवाड हिंसाचार आणि राबर्ट वडेरा जमीन प्रकरणावरुन विरोधक आक्रमक आहेत.

पावसाळी अधिवेशनाचे आता अवघे नऊ दिवस बाकी आहेत.. अशात १५ ऑगस्टपूर्वी अन्न सुरक्षा विधेयक पारित करुन घेण्याचा सरकारचा मानस आहे...दिल्ली, हरियाणा आणि आसामसारख्या राज्यात राजीव गांधी यांच्या जन्मदिवशी अर्थात २० ऑगस्टपासून अन्न सुरक्षा लागू करण्याचा सरकारचा विचार आहे.

याशिवाय माहिती अधिकारातून राजकीय पक्षांना बाहेर ठेवण्याचं विधेयकही या अधिवेशनात सादर होणार आहे.. या सगळ्या मुद्यांवर सर्वपक्षीय बैठकीत चर्चा होणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, August 13, 2013, 13:02


comments powered by Disqus