अडवाणींनी राजीनामा घेतला मागे BJP stalemate ends, Advani takes back his resignation

अडवाणींनी राजीनामा घेतला मागे

अडवाणींनी राजीनामा घेतला मागे
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

नाराजीनाम्यानंतर अडवाणींनी त्यांचा राजीनामा मागे घेतलाय. भाजपमध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेलं महाभारत अखेर संपलंय. लालकृष्ण अडवाणींनी राजीनामा मागे घेतलाय.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विनंतीनंतर अडवाणींनी राजीनामा मागे घेतल्याचं राजनाथ सिंहांनी सांगितलंय. काल अडवाणींनी भाजपच्या सगळ्या पदांचा राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर अडवाणींना मनवण्यासाठी भाजप नेत्यांची धावपळ सुरू झाली. काल रात्री भाजपची संसदीय बोर्डाची बैठक झाली. त्यामध्ये अडवाणींचा राजीनामा फेटाळण्यात आला.

आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अडवाणींची भेट घेतली आणि त्यांना भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती दिली. त्यावर पक्षाचा निर्णय मला मान्य असेल, असं अडवाणींनी म्हंटल्याचं राजनाथ सिंहांनी सांगितलंय. त्यामुळे अडवाणींनी राजीनामा मागे घेतल्याचं स्पष्ट झालंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, June 11, 2013, 19:00


comments powered by Disqus