नरेंद्र मोदींना मुस्लिम आणि दलितांचे समर्थन, bjps vote share of sc st higher than congresss no more

नरेंद्र मोदींना मुस्लिम आणि दलितांचे समर्थन

नरेंद्र मोदींना मुस्लिम आणि दलितांचे समर्थन

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
इंडिया टुडे ग्रुप आणि सिसेरो यांनी केलेल्या सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला २६१ ते २८३ जागा मिळू शकतात. सर्वेनुसार नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधान होणे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे अबकी बारचे उत्तर मोदी सरकार हेच असेल असा दावा सर्वेक्षणात करण्यात आला आहे.

सर्वेक्षणातील भाजपच्या दमदार प्रदर्शनाच्या विश्लेषणात काही इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या आहेत.

1. भाजप स्वबळावर बहुमत आणण्याचा आसपास
2. भाजप आतापर्यंतचे सर्व विक्रम तोडण्याची शक्यता.
3. काँग्रेसची सर्वात कामगिरी होणार, १०० पेक्षा कमी जागा मिळणार
4. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता.
5. एनडीएचे सरकार होणे निश्चित
6. २००९च्या तुलनेत भाजपला एससी आणि एसटीचे मतदानाचे टक्केवारी दुप्पट झाली आहे.
7. भाजपला एससी आणि एसटीची मते काँग्रेसपेक्षा जास्त मिळाली.
8. मुस्लिमांसाठी आता भाजप अस्पृश्य नाही.
9. भाजपला मिळाणाऱ्या मुस्लिम मतांमध्ये ६ टक्के वाढ झाली आहे.
10. काँग्रेसला मिळणाऱ्या मुस्लिम मतांची टक्केवारी २००९ सारखीच आहे.
11. भाजपला सोडून सर्व पक्षांना मुस्लिम मतांचे नुकसान झाले आहे.
12. भाजपला महिलांच्या मतांचा जास्त फायदा झाला आहे. २००९ मध्ये १८ टक्के महिलांनी भाजपला मतं दिले यंदा ३२ टक्के महिलांनी भाजपला मते दिली.
13. युवकांनीही भाजपला मतदान केले. भाजपचा वोट शेअर दुप्पट झाला आहे. १७ टक्क्यांनी वाढून ३५ टक्के झाला आहे.
14. इतर पक्षांना तरुणाईने नाकारले आहे. यात भाजपचे सहयोगी पक्ष आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 13, 2014, 15:53


comments powered by Disqus