Last Updated: Wednesday, April 17, 2013, 11:59
www.24taas.com, बंगळुरू बंगलोरमधल्या मल्लेश्वरम परिसर आज स्फोटानं हादरून निघालाय. सकाळी पावणे अकराच्या सुमारास हा स्फोट झाला. या स्फोटात दोन जण जागीच ठार झालेत तर १४ जण गंभीर जखमी आहेत. जखमींमध्ये आठ पोलीस आणि सहा नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी स्फोटाच्या आजुबाजुचा परिसर सील केलाय.
मल्लेश्वरम परिसरातील भाजपच्या कार्यालयाबाहेर हा स्फोट झालाय. रहिवासी भागात झाला स्फोट झाल्यानं नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. स्फोटामध्ये आत्तापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळतेय.
एका ओमनी कारमध्ये हा स्फोट झालाय. या स्फोटामुळे जवळच उभ्या असलेल्या तीन गाड्यांनीही पेट घेतला. स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बंगळुरूचे पोलीस आयुक्त घटनास्थळी दाखल झालेत.
सुरुवातीला हा सिलेंडरचा स्फोट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, पोलीस आयुक्तांनी ही शक्यता फेटाळून लावलीय.
First Published: Wednesday, April 17, 2013, 11:17