Last Updated: Tuesday, August 28, 2012, 17:18
www.24taas.com, नवी दिल्लीएकाच महिन्यात दोन पौर्णिमा आल्याने आकाशप्रेमी आणि खगोलप्रेमींना ३१ ऑगस्टला ब्लू मून पाहण्याची संधी प्राप्त झाली आहे. यानंतर पुन्हा ही संधी २०१५ साली मिळू शकणार आहे.
एकाच महिन्यात दोन वेळा पौर्णिमा आल्या तर दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्लू मून म्हटले जाते. दोन पौर्णिमांच्या मध्ये २९ दिवसांचे अंतर असते. मात्र ऑगस्ट महिन्यात ३० किवा ३१ दिवसच असल्याने क्वचित एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात.
सरासरी दोन वर्षे आणि सात महिन्यांनंतर अशी संधी येत असते असे खगोलतज्ज्ञ सांगतात. अर्थात हा चंद्र प्रत्यक्षात निळा दिसत नाही, तो नेहमीच्या चंद्रासारखाच असतो. मात्र नासाने त्याला ब्लू मून असे नाव दिल्याचे सांगण्यात येते.
ब्लू मून म्हणजे निळा चंद्र नव्हेब्लू मून म्हणजे चंद्र निळा दिसेल असे काही नाही. एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात. त्यामुळे या दिवशी चंद्रला वैज्ञानिकांनी ब्लू मून असे नाव दिले आहे. वैज्ञानिक परिभाषा यासाठी मानली गेली आहे.
एक महिना आणि कधी दिसणार२ डिसेंबर, ३१ डिसेंबर २००९
२ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट २०१२
२ जुलै, ३१ जुलै २०१५
२ जानेवारी, ३१ जानेवारी २०१८
First Published: Tuesday, August 28, 2012, 17:18