Last Updated: Thursday, August 15, 2013, 15:52
www.24taas.com, झी मीडिया, इम्फाळमणिपूरमधील रायफल्स परेडच्या मैदानापासून ४०० मीटर अंतरावर आज स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या काही मिनिटे अगोदरच एक प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोटात कोणालाही इजा पोहचली नाही.
सकाळी ९ वाजता स्वातंत्र्य दिवस साजरा केला जाणार होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री ओकराम इवोवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पोलिसांनी या विषयी माहिती देतांना सांगितले की, त्या स्फोटाची तीव्रता कमी होती पण त्याचा होणारा आवाज हा खूप लांबपर्यत गेला. हे विरोधी संघटनाचेच काम आहे.
स्वातंत्र्य दिनासाठी उपस्थित असणारे पोलीस अधिकारी त्वरीतच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्व मार्ग बंद केले आणि आजुबाजूला असणाऱ्या सर्व लोकांची चैकशी करून तपास करण्यात सुरूवात केली. ज्याठिकाणी हा स्फोट झाला आहे आता तेथे मुख्यमंत्री ओकराम आणि पोलिसांची सुरक्षा तुकडी तेथून एक किलोमीटर अंतरावर होती.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 15, 2013, 15:13