विवाहीत बहीणीवर सख्या भावानेच केला बलात्कार, brother Rape on sister in Gwalior

विवाहीत बहीणीवर सख्या भावानेच केला बलात्कार

विवाहीत बहीणीवर सख्या भावानेच केला बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया, ग्वालियर

आपल्या सख्या भावाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करायला गेलेल्या तरूणीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने युवतीने रागाच्या भरात आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार ग्वालियर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरबाडा येथे राहणाऱ्या तरूणींने आत्महत्या केली.

४५ वर्षीय भावाने ३२ वर्षीय बहिणीवर ती ११ वर्षांची असतानापासून बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

तरूणीच्या भावाने आपल्या विवाहीत बहीणीवर बलात्कार केला. पीडित महिला त्याविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी छोट्या बहिणीसोबत ग्वालियर पोलीस स्टेशनमध्ये पोहचल्या. मात्र तेथील उपस्थित पोलिसांनी दोन्हीं महिलांना दिलेल्या बलात्कार विरोधी तक्रार न नोंदविता. मारझोड झाल्याची तक्रार नोंदवली.

या घटनने पीडित युवतीने काल रात्री आपल्या राहत्या घरी फास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी आज युवतीच्या बहिणींने नोंदविलेल्या तक्रारीनुसार लथन बाथम यांच्याविरोधात बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंदवून घेतला आहे. पोलिसांच्या मते, या युवतीचा आपल्या पतीसोबत भांडण झालं होतं. त्यानंतर ती ग्वालियरला येऊन राहत होती. ती तिच्या लहान बहीणीसोबत राहत होती. मात्र काही दिवसांनी तिचा भाऊ येऊन त्याच्या घरी घेऊन गेला. आणि त्यानंतर तिच्या बलात्कार केला.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 9, 2013, 15:34


comments powered by Disqus