बहिणींवर बलात्कार रोखणाऱ्या भावावर झाडली गोळी!, brother who tries to preclude rape on sister shot died

बहिणींवर बलात्कार रोखणाऱ्या भावावर झाडली गोळी!

बहिणींवर बलात्कार रोखणाऱ्या भावावर झाडली गोळी!
www.24taas.com, झी मीडिया, बुरद्वान

पश्चिम बंगालमधील बुरद्वान जिल्ह्यात चार युवकांनी दोन बहिणींवर बलात्कार करून भावाची हत्या केलीय. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीय.

बुरद्वान जिल्ह्यामधील दैनहट येथील नासीपूर आदिवासी पाडा येथे ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत गणेश मुर्मू या २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. आपल्या दोन बहिणींवर आपल्यासमोर बलात्कार होताना पाहून गणेशनं या चार तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे चवताळलेल्या युवकांनी अत्यंत जवळून गणेशवर गोळी झाडली. गणेशला गोळी लागल्यानंतर हे तरुण घटनास्थळावरून पळून गेले.

गणेश मुर्मू हा खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. मुर्मू याचा मृतदेह कटवा येथील उपविभागीय ग्रामिण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपींचा शोध चालू असल्याचे पोलीस अधिक्षक एसएमएच मिर्झा यांनी सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, August 5, 2013, 11:08


comments powered by Disqus