येडियुरप्पांचा स्वगृही परतले, कर्नाटक जनता पक्ष भाजपमध्ये विलीनBS Yeddyurappa`s KJP merges with BJP

येडियुरप्पा स्वगृही परतले, कर्नाटक जनता पक्ष भाजपमध्ये विलीन

येडियुरप्पा स्वगृही परतले, कर्नाटक जनता पक्ष भाजपमध्ये विलीन
www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू

कर्नाटकमधील भाजपचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांचा स्वगृही परतलेत. येडियुरप्पांनी आपला कर्नाटक जनता पक्ष भाजपमध्ये विलीन केलाय.

कर्नाटक भाजपच्या आज झालेल्या बैठकीत येडियुरप्पांच्या पक्षातील पुर्नप्रवेशावर शिक्कामोर्तब झालं. आगामी लोकसभा निवडणूक आम्ही मिळून लढवू, असं भाजप प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं येडियुरप्पांनी आधीच स्पष्ट केलं होतं.

भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमधून वेगळं होतं कर्नाटक जनता पक्ष स्थापन केला होता.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 2, 2014, 21:57


comments powered by Disqus