बीएसएफ जवानाचा संसदेसमोरच जाळून घेण्याचा प्रयत्न, bsf soldier outside parliament try to immolating

बीएसएफ जवानाचा संसदेसमोरच जाळून घेण्याचा प्रयत्न

बीएसएफ जवानाचा संसदेसमोरच जाळून घेण्याचा प्रयत्न

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

शुक्रवारी दुपारी दिल्ली संसद भवनाच्या बाहेर एका व्यक्तीनं स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करू पाहणारा ही व्यक्ती एक `बॉर्डर सिक्युरिटी फोर्स` बीएसएफ जवान असल्याचं सांगितलं जातंय.

अशोक कुमार असं या व्यक्तीचं नाव आहे. १५ वर्षांपूर्वी त्याला बीएसएफमधून बरखास्त करण्यात आलं होतं. याचसंबंधी तक्रार दाखल करण्यासाठी तो गृह मंत्रालयात दाखल झाला होता.

अशोक आपल्या कुटुंबीयांसहीत गृहमंत्रालयात दाखल झाला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याची दोन मुलंही होती. गृहमंत्रालयाकडे आपली तक्रार नोंदविण्याचा त्यानं प्रयत्न केला. परंतु, निराशा पदरात पडल्यानंतर त्यानं स्वत:ला सर्वांसमोर जाळून घेण्याचा प्रयत्न केला.

परंतु, योग्य वेळीच पोलिसांनी त्याला अडवलं आणि आग लावण्यापासून परावृत्त केलं.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 21, 2014, 16:24


comments powered by Disqus