माया-मुलायमुळे सरकार तरले, देशाच्या माथी FDI!, BSP, SP walk out of Lok Sabha ahead of FDI vote

माया-मुलायमुळे सरकार तरले, देशाच्या माथी FDI!

माया-मुलायमुळे सरकार तरले, देशाच्या माथी FDI!

www.24taas.com,नवी दिल्ली
रिटेल क्षेत्रात एफडीआयच्या सरकारच्या निर्णयावर मतदान होण्यापूर्वीच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने लोकसभेतून वॉकऑऊट केल्यामुळे सरकार तरले आहे. समाजवादी पक्षाकडे २२ खासदार आहेत तर बसपकडे २१ खासदार आहेत.

शेतकरी आणि किराणा व्यापाऱ्यांची विरोधांनी उपेक्षा केल्यामुळे आम्ही वॉकआऊट केल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांनी म्हटले आहे.

यानंतर झालेल्या मतदानात सरकारने २५३ मते मिळवून एफडीआयला हिरवा कंदील प्राप्त करून घेतला आहे. सप आणि बसप यांच्या वॉकआऊटनंतर सरकारला बहुमतासाठी २५१ मतांची गरज होती. सरकारच्या बाजूने २६१ मते होती तर विरोधात १८२ मते होती. परंतु सरकारला बहुमतापेक्षा केवळ दोन मते जास्त मिळविण्यात यश मिळाले आहे. तर विरोधात २१८ मते पडली आहे.

First Published: Wednesday, December 5, 2012, 19:13


comments powered by Disqus