गोव्यात इमारत कोसळली, ८ ठार, १३ जखमी; आकडा वाढण्याची शक्यता, building collapsed in goa, 8 death

गोव्यात सहा मजली इमारत कोसळली, १५ ठार; ४०-४५ मजूर दबल्याची भीती

गोव्यात सहा मजली इमारत कोसळली, १५ ठार; ४०-४५ मजूर दबल्याची भीती
www.24taas.com, झी मीडिया, पणजी
गोवाची राजधानी पणजीपासून ७० किलोमीटर दूर असलेल्या काणकोण भागात इमारत कोसळून १५ मजूरांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीचं बांधकाम सुरू असतांना ही इमारत कोसळली आहे. पोलिस महानिरीक्षक ओपी मिश्रा यांनी १३ जण जखमी झाल्याची माहिती दिली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पररिकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत दुपारी तीन वाजेच्या सुमारास कोसळली, तसेच ढिगाऱ्यातून आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी किती जण या ढिगाऱ्याखाली अडकले असतील याची माहिती स्पष्टपणे मिळालेली नसली, तरी ४० जण या सहा मजली इमारतीच्या बांधकामाचं काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 4, 2014, 22:27


comments powered by Disqus