व्यास नदीत बस कोसळून ३२ जणांचा मृत्यू, bus accident in kullu, 32 dead

व्यास नदीत बस कोसळून ३२ जणांचा मृत्यू

व्यास नदीत बस कोसळून ३२ जणांचा मृत्यू
www.24taas.com, झी मीडिया, शिमला

हिमाचल प्रदेशमध्ये कुलू-मंडी राष्ट्रीय महामार्गावर एका खासगी बसला झालेल्या अपघातात ३२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं प्रवाशांनी भरलेली बस व्यास नदीत कोसळली.

त्या अपघातात ३२ प्रवासी जागीच ठार झाले, तर १५ प्रवाशाचे प्राण वाचवण्यात बचावदलाला यश आले आहे. सर्व जखमींना जवळच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आल आहे. या अपघातामधील जखमींना पाच हजार रुपये कर मृतांना १५ हजार रुपयांची मदत जिल्हा प्रशासनानं जाहीर केली आहे.

मात्र, बसचे नियंत्रण सुटले असल्याचे कळताच बसचालकाने चालू गाडीतून उडी मारून पळ काढला आहे. कुलु आणि मंडीच्या पोलीस अधिक्षक आणि उपायुक्तांच्या माहितीनुसार या बसमधून दोन पत्रकारही प्रवास करत होते. दोनजणांपैकी एक गंभीर जखमी असून दुसरे बेपत्ता आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 9, 2013, 10:40


comments powered by Disqus