गुजरातमध्ये मोदींची बाजी, बिहारमध्ये नितीश कुमारांना फटका, By-polls: Boost for Narendra Modi, jolt for Nitish Kumar

नरेंद्र मोदींची बाजी, नितीश कुमारांना फटका

नरेंद्र मोदींची बाजी, नितीश कुमारांना फटका
www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली

विधानसभा पोट निवडणुकीत गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने सहा पैकी पाच जागांवर विजय मिळविला असून, दोन लोकसभा आणि तीन विधानसभेच्या जागांचा समावेश आहे. २०१४च्या सेमी फायनलमध्ये नरेंद्र मोदींनी बाजी मारलीय. या यशामुळे भाजपमध्ये मोदींचं महत्त्व वाढलंय. तर बिहारमध्ये नितीश कुमारांना फटका बसला.

२०१४च्या लोकसभा निवडणूक प्रचाराची धुरा मोदींच्या खांद्यावर दिली जाईल, असं मानलं जातंय. गोव्यात होणाऱ्या भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे बिहारमध्ये नितीशकुमारांचा करिश्मा कमी होताना दिसतोय. महाराजगंज लोकसभा पोटनिवडणुकीत राजदच्या उमेदवाराने बाजी मारली. बिहारमधील निवडणुकांचे निकाल हाती आले असून, लालू प्रसाद यादव यांनी नीतिशकुमार यांना झटका दिला आहे. नीतिशकुमार यांचे उमेदवार पीके शाही यांचा प्रभुनाथ सिंग यांनी पराभव केला आहे.

गुजरातमधील धारोजी येथे भाजपने आघाडी घेतली. भाजपचे प्रवीण मंकाडीय यांची काँग्रेसचे उमेदवार हरिभाई पटेल यांना पराभूत केले.२६ व्या फेरीनंतर मंकाडिया हे ६,८०३ मतांनी आघाडी घेतली. यापूर्वी या सहाही मतदार संघामध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते.


पोरबंदर मधून भाजपचे विठ्ठल रडाजिया हे एक लाख २८ हजार मतांनी विजयी झाले आहेत. साबरकांठा येथून भाजपचे हरिभाई चौधरी हे ७१ हजार मतांनी आघाडीवर आहेत. मोरव्हा हदफ (एसटी) येथून भाजपचे निमिशा सुतार विजयी झाले असून, लिंबडी येथून क्रितीसिंह राणा विजयी झाले आहेत.

दरम्यान, बिहारमध्ये नीतिशकुमार यांना झटका बसला. नीतिशकुमार यांच्या सरकारला कंटाळलेल्या मतदारांनी आपल्या बाजूने कौल दिला आहे, अशी प्रतिक्रिया लालू प्रसाद यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 5, 2013, 19:45


comments powered by Disqus