मंत्रीमंडळात होणार मोठे बदल..., Cabinet minister changes

केंद्रीय मंत्रिमंडळात होणार मोठे बदल...

केंद्रीय मंत्रिमंडळात होणार मोठे बदल...
www.24taas.com, नवी दिल्ली

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याचे संकेत मिळतायेत. सूत्रांच्या माहितीनुसार सरकारमध्ये काही नव्या चेह-यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. जनार्दन द्विवेदी यांचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याची चर्चा आहे.

ऑस्कर फर्नांडीस यांनाही कॅबीनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसच राज्यसभेचे उपसभापती रहमान खान यांचं नावही राज्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे. मनिष तिवारी यांना सूचना-प्रसारण राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रेणुका चौधरी याचं नावही मंत्रीपदाच्या चर्चेत आहे.

सध्या विदेशमंत्री असलेल्या एस.एम.कृष्णा यांच्या जागेवर आनंद शर्मा यांची नियुक्ती करून कृष्णा यांच्यावर कर्नाटक कांग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा भार सोपवला जाऊ शकतो. तसच आरोग्यमंत्री गुलाब नबी आझाद यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालयाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येतीय.

First Published: Thursday, September 13, 2012, 11:28


comments powered by Disqus