Last Updated: Wednesday, September 19, 2012, 14:50
www.24taas.com, नवी दिल्ली काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये सिलिंडरवर जादा अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे आता तेथील नागरिकांना सहा ऐवजी नऊ सिलिंडर मिळणार आहेत.
केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात निर्णय घेत प्रत्येक कुटुंबाला सहा अनुदानित सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. या निर्णयावर देशभरात तीव्र संताप व्यक्त होत होता. ७०० ते ८०० रूपये मोजावे लागणार असल्याने देशात आंदोलनाची ठिणगी उडाली होती. अखेर काँग्रेस प्रणित केंद्र सरकारने आपले सरकार असलेल्या राज्यांमध्ये अनुदानित सिलिंडरच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती काँग्रेसचे महासचिव जनार्दन द्विवेदी यांनी आज दिली.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीनंतर पत्रकारांनी द्विवेदी आंनी हि माहिती दिली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यांत सहाऐवजी नऊ अनुदानित सिलिंडर देण्यास सांगितले असल्याचे ते म्हणाले. आता नागरिकांना नऊ सिंलिंडर पूर्वीच्या किंमतीत मिळणार आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, आसाम, आंध्र प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांतील जनतेला याचा लाभ मिळेल.
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी वर्षाला १२ सिलिंडर देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांनी मंगळवारी केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
First Published: Wednesday, September 19, 2012, 14:50