पोपट मुक्त होणार, सीबीआय संचालक समिती ठरवणार, CBI autonomy: Centre files affidavit in SC

पोपट मुक्त होणार, सीबीआय संचालक समिती ठरवणार

पोपट मुक्त होणार, सीबीआय संचालक समिती ठरवणार

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

सीबीआयच्या स्वायत्ततेवर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केलंय. यापुढे सीबीआयच्या संचालकांची निवड ही ३ सदस्यीय समिती करणार आहे.

या समितीत पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि लोकसभेचे विरोधीपक्ष नेत्यांचा समावेशाचं केंद्र सरकारने न्यायलयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय.

विशेष म्हणजे सीबीआय संचालकांना हटवण्याबाबतचा निर्णयही ही त्रिसदस्यीय समितीच घेणार आहे. भाजपनं मात्र सरकारच्या प्रतिज्ञापत्राची खिल्ली उडवलीय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 3, 2013, 23:17


comments powered by Disqus