Last Updated: Thursday, September 6, 2012, 16:41
www.24taas.com, नवी दिल्ली`कोळसाखाण वाटप झालेल्या कंपन्यांवर झालेली सीबीआय कारवाई फिक्स होती` असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केलाय. दोन दिवसांअगोदरच सीबीआय छापे टाकणार हे संबधित कंपन्यांना माहिती झाली होती. त्यामुळं ही कारवाई म्हणजे धुळफेक असल्याचा आरोप केजरीवालांनी केलाय.
काँग्रेसनं मात्र केजरीवालांचे आरोप बेजबाबदारपणाचे आहेत असा पलटवार केलाय. जर पुरावे असतील तर ते लोकांसमोर आणावेत असं आव्हानही काँग्रेसनं केजरीवालांना दिलाय.
यापूर्वीही अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’नं जंतरमंतरवर दिल्लीत ठिकाठिकाणी निदर्शनं केली. संसद, पंतप्रधान कार्यालय, सोनिया गांधींचे निवासस्थान, भाजप कार्यालय या सर्वच ठिकाणी केजरीवाल समर्थकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी बॅरिकेट्स तोडण्यात आले, तसच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.
First Published: Thursday, September 6, 2012, 16:41