प्रदीप जडेजा यांची चौकशी,नरेंद्र मोदी यांच्या अडचणी वाढणार?CBI Enquiryof Pradip Jadeja,will increase difficulties to Modi

प्रदीप जडेजा यांची चौकशी,नरेंद्र मोदी यांच्या अडचणी वाढणार?

प्रदीप जडेजा यांची चौकशी,नरेंद्र मोदी यांच्या अडचणी वाढणार?
www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद

इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने आज गुजरातचे कायदा राज्यमंत्री प्रदीप जडेजा यांची चौकशी केलीय. तर गुजरात सरकारचे आणखी एक मंत्री भूपेंद्र सिंह आणि अॅडव्होकेट जनरल कमल त्रिवेदी यांना समन्स पाठवण्यात आले आहेत.

इशरत जहॉ बनावट चकमक प्रकरणातील आरोपी, निलंबित आयपीएस अधिकारी जी. एल. सिंघल यांच्याकडून सीबीआयला एक पेन ड्राइव्ह मिळाला होता. त्यात मोदी सरकारमधील काही मंत्री आणि अधिकाऱ्यांमधील संभाषणाचं रेकॉर्डिंग असल्याचं सांगण्यात येतंय. त्याच अनुषंगाने, गुजरातचे कायदा राज्यमंत्री प्रदीप जडेजा यांची चौकशी करण्यात आली.

१९ नोव्हेंबर २०११ ला गुजरातचे महाधिवक्ता कमल त्रिवेदी यांच्या दालनात एक बैठक झाली होती. या बैठकीला गुजरातचे तत्कालीन गृह राज्यमंत्री प्रफुल्ल पटेल, तेव्हाचे कायदा राज्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा, भूपेंद्र सिंह, कायदा-सुव्यवस्था विभागाचे सचिव जी. सी. मुर्मु, गांधीनगरचे तत्कालीन महानिरीक्षक ए. के. शर्मा, जी. एल. सिंघल, त्यांचे मित्र रोहित वर्मा आदी उपस्थित होते.

यावेळी झालेली संपूर्ण चर्चा आपण रेकॉर्ड केल्याचं सिंघल यांनी सीबीआयला सांगितलं होतं. हेच रेकॉर्डिंग त्यांच्या पेन ड्राइव्हमध्ये असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 23, 2013, 14:52


comments powered by Disqus