ए राजा-कनिमोळीला तुरुंगात धाडणाऱ्या अधिकाऱ्याचा मृत्यू, CBI officer probing 2G scam dies

२ जी घोटाळा उघडकीस आणणाऱ्या अधिकाऱ्याचा मृत्यू

२ जी घोटाळा उघडकीस आणणाऱ्या अधिकाऱ्याचा मृत्यू
www.24taas.com, नवी दिल्ली

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या सीबीआय अधिकारी सुरेश कुमार पलसानिया यांचा बुधवारी रात्री रक्तपुरवठ्यात बिघाड झाल्यानं (ब्लड डिसऑर्डर) मृत्यू झालाय. सीबीआयचे एक उत्तम अधिकारी म्हणून ४४ वर्षीय पलसानिया यांची ओळख होती. दक्षिण दिल्लीतल्या एका खाजगी हॉस्पीटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला.

राजस्थानात राहणाऱ्या पलसानिया यांनी ओडिशा कॅडरमधून आलेले १९९६ सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. २००६ सालापासून त्यांची नियुक्ती सीबीआयमध्ये करण्यात आली होती. यंदाचा मेधावी सेवेसाठी मिळणारा पुरस्कार यंदा २६ जानेवारी रोजी पलसानिया यांना देण्यात आला होता.

सीबीआयचे मुख्याधिकारी ए पी सिंह यांनी पलसानिया यांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलंय. पलसानिया यांनीच टूजी घोटाळ्यात आरोपपत्र दाखल करून तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा आणि द्रमूक नेत्या कनिमोळी यांच्यासहित इतर उच्च अधिकाऱ्यांवर खटला दाखल केला होता. पलसानिया यांनी राष्ट्रकूल घोटाळ्याची चौकशीदेखील सुरू केली होती.

First Published: Thursday, November 8, 2012, 13:15


comments powered by Disqus