'बंटी-बबली'कडून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला अटक... , CBI raids on Yogendra Mittal`s home

'बंटी-बबली'कडून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला अटक...

'बंटी-बबली'कडून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला अटक...
www.24taas.com, नवी दिल्ली

सीबीआयने आयकर विभागाचे माजी उपसंचालक योगेंद्र मित्तल यांच्या घरी छापे मारलेत. योगेंद्र मित्तल असं या अधिका-याचं नाव आहे.

तत्कालीन आयकर उपसंचालक योगेंद्र मित्तलना तब्बल ५७ कोटींची लाच देणा-या उल्हास खैरेने टॅक्स गुरू म्हणून मिरवत भागधारकांना तब्बल ११००कोटींना गंडा घातलाय.

स्टॉक गुरू इंडिया नावानं कंपनी स्थापन करून त्याद्वारे हजारो जणांची लुबाडणूक करणा-या उल्हास खैरेकडून लाच घेतल्याप्रकरणी मित्तलांच्या घरी सीबीआयने धाड टाकली. गाझियाबादमधल्या कौशांबी इथल्या घरी आणि ऑफिसवर ही धाड टाकण्यात आली.

उल्हास खैरेकडून तब्बल ५७ कोटी रुपयांची लाच घेतल्याचं तपासात उघड झालंय. दरम्यान, उल्हास खैरे आणि त्याची पत्नी कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीत मित्तलने लाच घेतल्याची बाब निष्पन्न झालीये.११००कोटींचा फ्रॉड करणा-या उल्हास खैरेला पाठिशी घातल्याचा मित्तलवर आरोप आहे.

First Published: Tuesday, January 15, 2013, 11:56


comments powered by Disqus