पाठिंबा काढला; स्टॅलिनच्या घरावर छापे , CBI raids Stalin`s residence, DMK cries vendetta

पाठिंबा काढला; स्टॅलिनच्या घरावर छापे

पाठिंबा काढला; स्टॅलिनच्या घरावर छापे
www.24taas.com, चेन्नई

केंद्रातील यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर २४ तासांच्या आत डीएमकेचे नेते करुणानिधी यांचा मुलगा एम. के. स्टॅलिन यांच्या घरावर सीबीआयचे छापे पडलेत.

डीएमके नेते एम करुणानिधी यांचे पूत्र एम. के. स्टॅलिन यांच्या घरावर सीबीआयनं आज पहाटेच छापा टाकलाय. गुरुवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास सीबीआय स्टॅलिन यांच्या दारावर धडकली. स्टॅलिन यांनी गाड्यांची इंपोर्ट ड्युटी चुकविल्याचा आरोप आहे. चेन्नईतल्या स्टॅलिन यांच्या घरी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलीय.

डीआरआयने याबाबत सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यानुसार सीबीआयने स्टॅलिन यांच्या घरावर छापा टाकत कारवाई केलीये. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत सीबीआयनं एकूण १९ जागांवर छापे मारलेत.

स्टॅलिन यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. यूपीएतून बाहेर पडल्यामुळे सूडबुद्धीतून ही कारवाई करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलंय. पण, आम्ही कायदेशीररित्या लढणार असं त्यांनी म्हटलंय. महागड्या गाड्यांच्या करचुकवेगिरीबाबत मात्र त्यांनी कानावर हात ठेवले.

First Published: Thursday, March 21, 2013, 10:24


comments powered by Disqus