Last Updated: Thursday, April 25, 2013, 15:39
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली 2G घोटाळ्या प्रकरणी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष पी सी चाको यांना हटवण्याच्या मागणीसाठी समितीच्या १५ सदस्यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतलीय.
समितीतल्या ३० सदस्यांपैकी १५ सदस्यांनी ही मागणी केलीय. यात भाजप, जेडीयू, बीजेडी, द्रमुक, AIADMK, आणि डाव्या पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे. टूजीच्या चौकशीसाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जेपीसीसमोर बोलवण्यात यावं अशी भाजपची मागणी आहे.
जेपीसीच्या अहवालात मात्र मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना क्लीन चीट देण्यात आलीय. तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचा अहवालात उल्लेख आहे. त्यामुळं भाजपचे नेते अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यामुळं जेपीसीचे अध्यक्ष पी सी चाको यांनाच हटवण्याची मागणी आता पुढं आलीय.
जेपीसीला ला १० मेपर्यंत संसदेत अहवाल मांडणं आवश्यक आहे. मात्र आता या अहवालावरून वाद निर्माण झाल्यानं य़ा अहवालाच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह लागलंय.
First Published: Thursday, April 25, 2013, 15:38