गूड न्यूज : पेट्रोल २ रू. स्वस्त होण्याची शक्यता, chances petrol price decrease by 2 Rupee

गूड न्यूज : पेट्रोल २ रू. स्वस्त होण्याची शक्यता

गूड न्यूज : पेट्रोल २ रू. स्वस्त होण्याची शक्यता
www.24taas.com, नवी दिल्ली

सामान्यांसाठी एक गूड न्यूज आहे. पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता आहे... पेट्रोल २ रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी याचे संकेत दिले आहेत... दोन महिन्यात चौथ्यांदा पेट्रोल स्वस्त होणार आहे... तर दुसरीकडे एप्रिल महिन्यात डिझेलचे दर वाढण्याची शक्यता नाही... कच्च्या तेलाचे भाव कोसळणे आणि डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याचा फायदा सामान्यांना होणार आहे...

याआधी १६ एप्रिलला पेट्रोल १ रुपयानं स्वस्त झालं होतं. पुन्हा एकदा पेट्रोल स्वस्त झाल्यास सामान्यांना मात्र चांगलाच दिलासा मिळणार आहे. त्यामुळे पेट्रोल दर २ रूपयाने स्वस्त झाल्यास त्यांच्या फायदा नक्कीच होईल. डॉलरची किंमत घटल्याने, आणि रूपया मजबूत झाल्याने पेट्रोलचे दर कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


तुमच्या शहरातील पेट्रोलचा सध्याचा दर


मुंबई - ६९.०८ रुपये


दिल्ली - ६६.०९ रुपये


चेन्नई - ६९.०८ रुपये


कोलकाता - ७३.४८ रुपये



First Published: Tuesday, April 23, 2013, 14:33


comments powered by Disqus