Last Updated: Sunday, June 8, 2014, 22:37
www.24taas.com, झी मीडिया, हैदराबादतेलंगणाविरहित आंध्रप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री म्हणून तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू यांनी शपथ घेतली.
राज्यपाल ई.एस.एल. नरसिंहन यांनी नायडू यांच्यासह काही मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
या सोहळ्याला केंद्रीय मंत्र्यांसह भाजपचे ज्येष्ठ नेते हजर होते. शिवाय इतर राज्याचे मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित होते.
मात्र चंद्राबाबूंच्या वैयक्तिक निमंत्रणानंतरही तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी या शपथविधी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, June 8, 2014, 22:37