दिल्लीत फेरबदल, सात मंत्र्यांचे राजीनामे, Change in Delhi, seven minister resigns

दिल्लीत फेरबदल, सात मंत्र्यांचे राजीनामे

दिल्लीत फेरबदल, सात मंत्र्यांचे राजीनामे
www.24taas.com, नवी दिल्ली

दिल्लीत मंत्रिमंडळ फेरबदलाच्या घडामोडींना वेग आलाय. फेरबदलाआधी मंत्र्यांचं राजीनामा सत्र सुरु आहे. सात मंत्र्यांनी दिलेले राजीनामे राष्ट्रपतींनी मंजूर केलेत. दरम्यान, रविवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातूनही काही जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

परराष्टमंत्री एस. एम. कृष्णा यांनी राजीनामा देत या राजीनामासत्राला सुरुवात केली. नव्या चेह-यांना संधी देण्यासाठी राजीनामा देत असल्याचं कृष्णा म्हणालेत. कृष्णांच्या राजीनाम्यानंतर सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक आणि कोळसा खाण मंत्री सुबोधकांत सहाय यांनीही राजीनाम्याची घोषणा केलीयं. तर माहिती आणि प्रसारण मंत्री अंबिका सोनी यांनीही मंत्रिमंडळातून बाहेर पडत असल्याचं स्पष्ट केलंय. याशिवाय अगाथा संगमा, विंसेंट पाला आणि महादेव खंडेला यांनीही राजीनामे दिलेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातूनही काही जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मुंबईतून गुरूदास कामत यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर दक्षिण मुंबईचे खासदार मिलींद देवरा यांना कॅबिनेटपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. तर शिवराज पाटील-चाकूरकर यांचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

First Published: Saturday, October 27, 2012, 22:20


comments powered by Disqus