Last Updated: Monday, November 18, 2013, 20:45
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीआम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत आज एकच गोंधळ उडाला. एका तरूणानं आज केजरीवालांची पत्रकार परिषद सुरू असताना, त्यांच्या अंगावर काळी शाई उडवली.
या प्रकारामुळं थोड्या वेळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यातच हा तरूण अण्णा हजारे झिंदाबादच्या घोषणा देत होत्या. नचिकेत वाल्हेकर असं या तरूणाचं नाव आहे. विशेष म्हणजे हा मराठी तरूण अण्णा हजारेंच्या नगर जिल्ह्यातला आहे.
केजरीवाल आणि कंपनीनं अण्णा हजारेंच्या नावाचा वापर करून घेतला आणि गरज सरल्यानंतर त्यांना दूर केलं, असा या तरूणाचा मुख्य आक्षेप होता. या प्रकाराबाबत भाष्य करताना अरविंद केजरीवाल यांनी अण्णांच्या नावानं हे प्रकार यापुढंही होणार आहेत, असं म्हटलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, November 18, 2013, 20:45