नव्या वर्षात जुनं चेकबुक निरुपयोगी Cheque book will become useless in 2013

नव्या वर्षात जुनं चेकबुक निरुपयोगी

नव्या वर्षात जुनं चेकबुक निरुपयोगी
www.24taas.com, नवी दिल्ली

नव्या वर्षाची चाहूल लागताच अनेक सरत्या वर्षातल्या अनेक गोष्टी मागे सोडून देतो. मात्र यंदा नव्या वर्षाच्या सुरूवातीला जुनं चेकबूकही असंच सोडून द्यावं लागणार आहे. कारण १ जानेवरी २०१३पासून देशभरात नवी चेक ट्रंकेशन सिस्टम(सीटीएस) सुरू होणार आहे. त्यामुळे आपण १ जानेवारीपासून जुन्या चेकबूकचा वापर करू शकणार नाही.

सीटीएसमुळे चेक क्लिअरन्ससाठी एकीकडून दुसरकडे न पाठवता चेकची इलेक्ट्रॉनिक इमेज बनवली जाणार आहे. हिच इमेज पाठवली जाऊन चेक क्लिअरन्स होणार आहे. यामुळे चेक क्लिअरन्सची प्रोसेस अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.

या नव्या प्रोसेससाठी नव्या प्रकारच्या चेकची गरज पडणार आहे. या चेकवर अल्ट्रा व्हॉयलेट शाईमध्ये एक लोगो छापला असेल. अकाउंट नंबरखाली एक पेंटाग्राम असेल. तसंच दुसऱ्या बाजूला सीटीएस २०१० असं लिहीलं असेल. पोस्ट डेटेड चेक देताना जुना चेक रद्द करूनच नवा चेक द्यावालागणार आहे.

First Published: Tuesday, December 4, 2012, 18:07


comments powered by Disqus