चिदम्बरम यांनी दिली घोटाळ्याची कबुली Chidambaram Confesses

चिदम्बरम यांनी दिली घोटाळ्याची कबुली

चिदम्बरम यांनी दिली घोटाळ्याची कबुली
www.24taas.com, नवी दिल्ली

शेतक-यांसाठीच्या पंचावन्न हजार कोटींच्या कर्जमाफी योजनेतली नेमकी किती रक्कम अपात्र शेतक-यांना वाटली गेली, याबाबत सखोल चौकशी कऱणार असल्याचं पी. चिदंबरम यांनी म्हटलंय.

या गैरव्यवहाराबाबत नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक तपास करत असून दोषी बँकांवर कारवाई करणार असल्याची घोषणाही चिदम्बरम यांनी केली आहे. एकीकडे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत, तर दुसरीकडे कोल्हापूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचं उल्लंघन होतंय.


आरबीआयनं आदेश दिल्यानंतर महिना उलटून गेल्यानंतरही जिल्हा मध्यवर्ती बँकेनं शेतक-यांकडून 112 कोटींच्या रकमेची वसुली केलेली नाही. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर काय कारवाई करणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय.

First Published: Tuesday, February 26, 2013, 20:32


comments powered by Disqus