दिल्लीत जन्मलं दोन डोके आणि तीन पायांचं बाळ, child born with two heads three legs of the child

दिल्लीत जन्मलं दोन डोके आणि तीन पायांचं बाळ

दिल्लीत जन्मलं दोन डोके आणि तीन पायांचं बाळ

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्लीतल्या इंदिरा गांधी महिला तसंच बाल चिकित्सालयात गुरुवारी एका असामान्य बाळानं जन्म घेतलाय. या बाळाला दोन डोके आणि तीन पाय आहेत. राजधानीत अशा प्रकारच्या बाळानं जन्म घेतल्याचा हा पहिलाच प्रकार आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या स्थितीला कन्जॉइन्ट ट्विन्स असं म्हटलं जातं. यामध्ये, दोन भ्रुणांची शरीरं एकमेकांना जोडलेली असतात. या बाळांवर कमला नेहरु हॉस्पिटल स्थित गांधी मेडिकल कॉलेजच्या पीडियाट्रिक विभागात सुरु आहे. मुलांची स्थिती अद्यापही गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय.

गांधीनगरला राहणाऱ्या 25 वर्षांच्या मिनूला (बदललेलं नाव) प्रसववेदना सुरू झाल्यावर तिला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. इथं प्रियांकानं तीन मुलांना जन्म दिला. यातील एका बाळाची प्रकृती स्थिर आहे. तर दोन बाळांचे शरीर एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत आहेत. आईची प्रकृती ठिक असल्याचं सांगण्यात येतंय.

या बाळांना सध्या अँन्टीबायोटिक आणि इतर औषधं दिली जात आहेत. त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांची पुढची तपासणी केली जाऊ शकते.

अशी स्थिती एक लाख मुलांमध्ये निर्माण होऊ शकते. काही वेळा ही परिस्थिती प्राकृतिक कारणांमुळे निर्माण होते... तर काही वेळा आनुवांशिकतेमुळेही... तसंच गर्भावस्थेत आईनं घेतलेल्या औषधांच्या साईड इफेक्टमुळेही भ्रुणाचा विकास खुंटतो... योग्य पोषण न मिळाल्यानंही ही परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. बाळांचे डोके जोडलेले असेल आणि हृद्य एकच असेल तर अशा प्रकारचे बाळांचं जीवन वाचवण्याची शक्यता खूपच कमी असते, असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलंय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 30, 2014, 17:52


comments powered by Disqus