Last Updated: Monday, February 3, 2014, 18:01
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि महाराष्ट्र प्रभारी मोहनप्रकाशही यावेळी हजर होते.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जवळीक निर्माण होत असल्याची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.
पवारांच्या कोल्हापुरातल्या मोदींबाबतच्या वक्तव्याचीही या बैठकीत दखल घेतली गेली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर अद्याप एकमत झालेलं नाही. त्यामुळं या बैठकीला महत्त्व आलंय. या भेटीनंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचीही मुख्यमंत्र्यांसह अन्य नेते भेट घेणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, February 3, 2014, 17:52