Last Updated: Tuesday, October 2, 2012, 18:58
www.24taas.com, कानपूर `नवा नवा विजय आणि नव्या लग्नाचे वेगळेच महत्त्व असते. कालांतराने विजय जुना होत जातो. जसे बायको जुनी होत जाते, तो आनंद राहत नाही.` असं खळबळजनक वक्तव्य कोळसामंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी केलं आहे. त्यामुळे मात्र आता चांगलाच वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
जयस्वाल यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत कवी संमेलन आयोजित करण्यता आले होते. त्यावेळी जयस्वाल म्हणाले,
यांच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. कानपूरमध्ये जयस्वाल यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. जयस्वाल यांच्या वक्तव्यावरुन सोनिया गांधी आणि जयस्वाल यांच्या पत्नीने प्रतिक्रीया दिली पाहिजे, अशी मागणी काही महिला संघटनांनी केली आहे. स्वतः जयस्वाल हेदेखील जुने झाले आहेत. त्यांच्याबद्दल काय म्हणावे, अशी टीका एका महिलेने केली.
भाजप नेत्या स्मृति इराणी यांनी टीका करताना म्हणले की, जयस्वाल यांना नेता म्हणणे म्हणजे नेता शब्दाचाच अपमान आहे. महिलांबद्दल असे विचार असलेला व्यक्ती मंत्रीच काय तर कोणत्याही पक्षात राहण्याच्या लायकीचा नाही. अशा व्यक्तीला धडा शिकविण्याची गरज आहे.
First Published: Tuesday, October 2, 2012, 18:45