Last Updated: Tuesday, June 11, 2013, 12:37
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली कोळसा घोटाळ्यात केंद्रीय चौकशी समितीनं (सीबीआय) मंगळवारी घोटाळ्यात नव्या गुन्ह्यांची नोंद केलीय.
या घोटाळ्यात सीबीआयनं ‘जिंदाल स्टील अन्ड पॉवर लिमिटेड’चे मालक आणि खासदार नवीन जिंदाल यांच्याविरुद्ध नवीन कलमांची नोंद केलीय. आरोपींमध्ये माजी कोळसामंत्री दसारी नारायण राव यांच्या नावाचाही समावेश आहे.
सीबीआय सूत्रांच्या माहितीनुसार, जिंदाल स्टील अन्ड पॉपर लिमिटेड, गगन स्पॉन्ज आणि आणखी दोघांविरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीय.
सीबीआय कोळसा घोटाळा प्रकरणात दिल्ली, हैदराबादसहीत अन्य १५ ठिकाणांवर छापे मारत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 11, 2013, 12:37