देशात थंडीची लाट, दिल्ली गोठली, Cold wave in country, india

देशात थंडीची लाट, दिल्ली गोठली

देशात थंडीची लाट, दिल्ली गोठली
www.24taas.com,नवी दिल्ली

देशात थंडीची लाट आलीय. तापमानात कमालीची घट झाल्याने दिल्ली, काश्मीर खोरे गोठून गेले आहे. दिल्लीत आज पहाटे अवघे १ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

थंड वाऱ्यांचा ओघ वाढल्याने राजधानी दिल्लीत आज पहाटे या मोसमातील सर्वांत नीचांकी तापमान नोंदविण्यात आले. या थंडीचा परिणाम हवाई आणि रेल्वे सेवेवर झाला असून, धुक्यामुळे सर्व वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

मुंबईतही गेले तीन दिवस थंडी आहे. १२ अंश सेल्सियस तपमान असून महाराष्ट्रात नाशिक, पुणे, नगर आदी जिल्ह्यात निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर राजस्थान, मध्यप्रदेशात कडाक्यातच्या थंडीची लाट आली आहे. त्यामुळे अनेक भागात शेकोट्या पेटल्याच्या दिसत आहेत. थंडीचा मुक्काम आणखी काही दिवस राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

जम्मू-काश्मीनरवर सध्या पश्चिंमी चक्रावात नसल्याने तेथून जोरदार थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे दिल्ली, हरियाना, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेशात गारठा आहे. नागरिकांना उबदार कपड्यांबरोबरच शेकोट्यांचाही आधार घ्यावा लागतो आहे. पश्चि म चक्रावात सक्रिय झाला असून, दोन ते तीन दिवसांनी तो जम्मू-काश्मीोर भागावर येईल, तोपर्यंत तरी थंडी कायम राहण्याचा अंदाज वर्तविला आहे.

First Published: Monday, January 7, 2013, 12:28


comments powered by Disqus