Last Updated: Tuesday, February 12, 2013, 15:21
www.24taas.com, कोलकाता काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. कोलकतामध्ये महाविद्यालयीन निवडणुकीदरम्यान वाद उफाळून आला. या वादात एका पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला तर चार विद्यार्थी गंभीर जखमी आहेत.
गार्डन रीच भागातील एका महाविद्यालयात निवडणूक अर्ज भरताना काँग्रेस आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर जोरदार दगडफेक करण्यात आली.
हा वाद विकोपाला गेला. दगफेकीत विद्यार्थ्यांसह पोलीस जखमी झालेत. जखमी पोलीस उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून, शीघ्र कृती दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्यात.
First Published: Tuesday, February 12, 2013, 14:52