Last Updated: Wednesday, May 21, 2014, 18:31
www.24taas.com, झी मीडिया, चेन्नईतामिळनाडूच्या तिरूनेलवेली जिल्ह्यात तझयुतू मध्ये चार गुंडांनी तिकीट मागणाऱ्या एका कंडक्टरला जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. पोलिसांनी कंडक्टरला जीवंत जाळल्याच्या आरोपावरून दोघांना अटक करण्यात आले आहे. भाजलेल्या अवस्थेत कंडक्टरला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार आरोपी गंगैकोंडन शहरात खासगी बसमध्ये चढले. बसच्या कंडक्टरने चारही आरोपींकडे तिकीट मागितले. चारही दारूनच्या नशेत होते. त्यांनी तिकीटाचे पैसे दिले नाही म्हणून त्यांनी चौघांना तझयुतू येथे बसमधून उतरवले.
त्यानंतर आरोपींनी ऑटो रिक्षातून बसचा पाठलाग केला. बस अडवून कंडक्टरच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि जीवंत जाळले. स्थानिक नागरिकांनी आग विझवून कंडक्टरला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बसमधील प्रवाशांनी घटनास्थळावरून दोघा आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंडक्टर ३० टक्के भाजला आहे आणि त्याचा इलाज सुरू आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 21, 2014, 18:20