टोल मागितल्याने खासदाराने रोखली बंदूक, MP`s gun show

टोल मागितल्याने खासदाराने रोखली बंदूक

टोल मागितल्याने खासदाराने रोखली बंदूक
www.24taas.com, बडोदा

काँग्रेस खासदाराच्या दादागिरीची. टोल मागितला म्हणून गुजरातमध्ये काँग्रेसच्या खासदारानं टोलनाक्यावर बंदुकीचा धाक दाखवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

काँग्रेसचे पोरबंदरचे खासदार विठ्ठल राडिया यांनी बडोद्यामध्ये एका टोलनाक्यावर कर्मचार्यांणना बंदुकीचा धाक दाखवल्याचं सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसतंय. काही वेळ अशाप्रकारे बंदुक घेऊन मिरवल्यानंतर हे खासदार महोदय त्याठिकाणाहून निघून गेले.

राष्ट्रीय महामार्ग आठवर करजानजवळील टोलवर हा प्रसंग घडला. यासंदर्भात टोल जमा करणा-या खासगी कंपनीनं तक्रार दाखल केलीए. पोलीस पुढील तपास करत आहेत.

First Published: Friday, October 12, 2012, 22:25


comments powered by Disqus